beed akshardham

रोकडेश्वरी आई देवी मंदिरचा जिर्णोद्धार व कलशरोहन मोठ्या आनंदात करण्यात आला – पांडुरंग आवारे-पाटील

बीड अक्षरधाम चौसाळा प्रतिनिधी – दि.07/ ऑक्टोबर 2025 रोजी रोकडेश्वरी आई देवी जाग्रत देवस्थान मंदिराचा जीर्णोध्दार व कलशरोहन कार्यक्रम श्री.नरेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविक भक्ताच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी ह भ प श्री संजय महाराज पाचपोर यांचे किर्तन सकाळी 10 ते 12.30 वाजेपर्यंत झाले त्यानंतर मानेवाडी.ता.जि.बीड, पिंपळगाव घाट,वाढवणा,…

धारूर तहसीलवर वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा धडकला

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक; शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार अनुदानासह ८ प्रमुख मागण्यांचे निवेदन ​धारूर बीड अक्षरधाम -अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान, प्रलंबित सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास होत असलेला विलंब आणि मूलभूत प्रश्नांकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षाचा निषेध करत, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज, बुधवारी धारूर तालुक्यात ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात…

09 ऑक्टोबर  रोजी परळी शहरात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संविधान प्रेमींकडून निदर्शने

 परळी प्रतिनिधी- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेक करणाऱ्या देशद्रोही वकील राकेश किशोर या वकिलावर गुन्हा दाखल करावा व या घटनेच्या निषेधार्थ परळी शहरात आज संविधान प्रेमी नागरिकांकडून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.       भारतीय संविधान आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी या देशातील न्याय व्यवस्था…

कणा-कणाने ज्ञान मिळवून शील सदाचाराने वागून कर्तुत्ववान बना – पी व्ही बनसोडे

  महामानव अभिवादन ग्रुपच्या 4 थ्या मोफत शिकवणी वर्गाचे उदघाटन संपन्न   बीड अक्षरधाम -प्रतिनिधी  मधमाशा कणा-कणाने निसर्गातील विविध फुलांमधील मध गोळा करतात व मधाच्या पोळ्यात साठवतात. त्या मधाचा उपयोग आपण मानव करतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत क्षणही वाया न जाऊ देता कणा-कणाने आपल्या पाल्याकडून, गुरुजनाकडून, निसर्गाकडून व पुस्तकाच्या सहवासात…

माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख व संध्या देशमुख यांचा जनसंपर्क अभियानाला सुरुवात…

संध्याताई दीपक देशमुख जनसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद बीड अक्षरधाम प्रतिनिधी – परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. सोबत त्यांच्या पत्नी संध्या देशमुख महिलांची टीम घेऊन मैदानात उतरले आहे. या अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिला वर्गातून मिळत आहे. सप्तशृंगी…

बौद्ध धम्म रॅलीत जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी सहभागी व्हावे. संयोजन समिती

बीड अक्षरधाम प्रतिनिधी  –  बौद्ध धम्म रॅलीत जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समिती यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बुद्ध विहार येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीमध्ये किल्लारी येथील पूज्य भंते धम्मसार थेरो…

केज तालुक्याचे भूमिपुत्र ते हैद्राबाद विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ.विष्णु सरवदे

केज  प्रतिनिधी – केज तालुक्यातील साबला (ता. केज, जि. बीड) या छोट्याशा गावातील डॉ .विष्णु सरवदे या सुपुत्राने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाने कठोर परिश्रम, चिकाटी व शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर हैद्राबाद येथील नामांकित हैदराबाद केद्रीय विश्वविद्यालयाच्या (Central University of Hyderabad) हिंदी विभाग…

पवनराजे इंग्लिश स्कूलमध्ये गरबा महोत्सव उत्साहात संपन्न

लहान-चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग केज – प्रतिनिधीप वनराजे इंग्लिश स्कूल केज येथे नवरात्र उत्सवानिमित्त गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील लहान-चिमुकल्यांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. नृत्याच्या तालावर गोल फिरताना विद्यार्थ्यांनी आनंदाचा वर्षाव केला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गरब्याला…

न.प.मुख्याधिकाऱ्यां सोबत बीड शहर बचाव मंचाची पुनःस्मरण बैठक….

धानोरा रोड सोबतच अंकुश नगर रस्त्याचे काम चालू करा… शहरातील अनेक महत्त्वाच्या कामांविषयी एक तास सकारात्मक चर्चा…. बीड अक्षरधाम  प्रतिनिधी – बीड नगरपरिषदेचे सकारात्मक पद्धतीने कार्यरत झालेले मुख्याधिकारी मा. शैलेश फडसे यांच्यासोबत बीड शहरातील अतिशय तातडीच्या समस्यां व मागण्यां विषयी बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाची सविस्तर सकारात्मकपणे एक तास चर्चा…

परळी तालुक्यातील बेलंबा येथे सुजातदादा आंबेडकर यांचे बॅनर फाडले   गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी 

बीड अक्षरधाम प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या परळी येथील एल्गार महासभेच्या निमित्ताने बेलंबा,ता.परळी येथे लावण्यात आलेले बॅनर फाडल्याने गावात तणाव निर्माण झाला असून याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिसांना करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नुकतीच दिनांक 29…