09 ऑक्टोबर  रोजी परळी शहरात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संविधान प्रेमींकडून निदर्शने

09 ऑक्टोबर  रोजी परळी शहरात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संविधान प्रेमींकडून निदर्शने

 परळी प्रतिनिधी- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेक करणाऱ्या देशद्रोही वकील राकेश किशोर या वकिलावर गुन्हा दाखल करावा व या घटनेच्या निषेधार्थ परळी शहरात आज संविधान प्रेमी नागरिकांकडून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.

      भारतीय संविधान आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी या देशातील न्याय व्यवस्था सर्वात महत्वाचा घटक आहे.देशात कायद्याची अंमलबजावणी होते किंवा नाही,शासन – प्रशासन भारतीय संविधानानुसार काम करत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याचे काम सर्वोच्च न्यायालय करीत असते.धर्मानिरपेक्षक्ष संविधान हे लोकशाहीचा आत्मा आहे.आणि देशातील या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर एका सनातनी देशद्रोही वकिलाने बुट फेकून हल्ला केला आहे. हा हल्ला या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर झालेला आहे. ही घटना अत्यंत गंभीर आणि देशद्रोहाचा गुन्ह्यासारखीच आहे.

या हल्लेखोर राकेश किशोर वकिला वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याला केंद्र सरकारने अटक करावी या मागणीसाठी आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथे सकाळी 11 वाजता तमाम संविधान प्रेमी नागरिकांकडून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. या निदर्शनात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *