धार्मिक

अंधश्रद्धा, व्यसनापासून मुक्त राहून शुद्ध अंत: करणाने निस्वार्थपणे गरिबांची सेवा करने हेच संत गाडगेबाबांना खरे अभिवादन ठरेल – प्रा.डॉ.पांडुरंग सुतार

( इंदिरानगर येथे 05 व्या मोफत शिकवणी वर्गचा प्रारंभ करून संत गाडगेबाबांना अभिवादन… ” महामानव अभिवादन ग्रुपचा उपक्रम “) बीड अक्षरधाम प्रतिनिधी – अंधश्रद्धा कर्मकांड व व्यसनापासून मुक्त राहुन शुद्ध अंत:करणाने निस्वार्थपणे गरिबांची सेवा करणे हेच संत गाडगेबाबांना खरे अभिवादन ठरेल असे डॉ..प्रा.पांडुरंग सुतार यांनी इंदिरा नगर कॅनाल रोड बीड…

मनाच्या शुद्धतेनेच माणूस शीलवंत आणि सदाचारी होतो – पूज्य भंते धम्मशील थेरो

सम्यक संबुद्ध विहार नागोबा गल्ली येथे वर्षावास समापन धम्मदेशनेने संपन्न  बीड  अक्षरधाम प्रतिनिधी पूज्य डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक चंपावती नगरी बीडला लाभलेले पूज्य भन्ते धम्मशील थेरो यांच्या अथक प्रयत्नाने मौजे शिवनी येथे स्थापन झालेल्या प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बीड परिसरात व बीड जिल्ह्यात धम्माचे अनेक कार्यक्रम संपन्न…

वैज्ञानिक दृष्टिकोन, मैत्री व करुणेचे बुद्ध तत्त्वज्ञानच जगात शांती स्थापन करू शकते…. पूज्ज भन्ते धम्मशील थेरो (धम्मदीप बुद्ध विहार येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न)

बीड अक्षरधाम प्रतिनिधी, आपला भारत देश जगात बुद्ध भूमी म्हणून ओळखला जातो. सुमारे 2500 वर्षांपूर्वी जगात दुःख आहे व दुःखाला कारण आहे हे शोधण्याकरिता राजमहाल सोडणारे सिद्धार्थ यांना सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर तथागत गौतम बुद्ध म्हणून ओळखल्या जाऊ लागले तथागत गौतम बुद्धांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रज्ञा, मैत्री,शील,करुणेचे तत्त्वज्ञानच जगात शांती स्थापित…

रोकडेश्वरी आई देवी मंदिरचा जिर्णोद्धार व कलशरोहन मोठ्या आनंदात करण्यात आला – पांडुरंग आवारे-पाटील

बीड अक्षरधाम चौसाळा प्रतिनिधी – दि.07/ ऑक्टोबर 2025 रोजी रोकडेश्वरी आई देवी जाग्रत देवस्थान मंदिराचा जीर्णोध्दार व कलशरोहन कार्यक्रम श्री.नरेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविक भक्ताच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी ह भ प श्री संजय महाराज पाचपोर यांचे किर्तन सकाळी 10 ते 12.30 वाजेपर्यंत झाले त्यानंतर मानेवाडी.ता.जि.बीड, पिंपळगाव घाट,वाढवणा,…

कणा-कणाने ज्ञान मिळवून शील सदाचाराने वागून कर्तुत्ववान बना – पी व्ही बनसोडे

  महामानव अभिवादन ग्रुपच्या 4 थ्या मोफत शिकवणी वर्गाचे उदघाटन संपन्न   बीड अक्षरधाम -प्रतिनिधी  मधमाशा कणा-कणाने निसर्गातील विविध फुलांमधील मध गोळा करतात व मधाच्या पोळ्यात साठवतात. त्या मधाचा उपयोग आपण मानव करतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत क्षणही वाया न जाऊ देता कणा-कणाने आपल्या पाल्याकडून, गुरुजनाकडून, निसर्गाकडून व पुस्तकाच्या सहवासात…

बौद्ध धम्म रॅलीत जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी सहभागी व्हावे. संयोजन समिती

बीड अक्षरधाम प्रतिनिधी  –  बौद्ध धम्म रॅलीत जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समिती यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बुद्ध विहार येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीमध्ये किल्लारी येथील पूज्य भंते धम्मसार थेरो…

बीडमध्ये सहावी बौद्ध धम्मपरिषद 2 ऑक्टोबर रोजी-भिक्खु धम्मशील थेरो 

धम्म रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धम्मदेसनेतून उजळणार ६९ वा धम्मचक्र दिन बीड अक्षरधाम प्रतिनिधी -सम्यक संबुद्ध गौतम बुद्धांचे मानवी तत्वज्ञान लोकांपर्यंत जावे यासाठी प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीडच्या विद्यमाने आयोजित अखिल भारतीय सहावी बौद्ध धम्मपरिषदेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे बौद्ध उपासक-उपासिका,आंबेडकरी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन…

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भिक्खु संघाची धम्मध्वज रॅली भिक्खु धम्मशिल थेरोंचे उपस्थित राहण्याचे आवाहन

बीड अक्षरधाम प्रतिनिधी  – बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी काढण्यात आलेली धम्मध्वज रॅली आता बीडमध्ये दाखल होत आहे. नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीपासून सुरुवात झालेली ही रॅली मध्यप्रदेशातील सौंसरपर्यंत मार्गक्रमण करत असून, तिचा ठाणाव मंगळवार (दि. 9 सप्टेंबर) रोजी बीडमध्ये होणार आहे. या संदर्भात शुक्रवार (दि. 5) रोजी बीड…

लहान वयात मोठा संकल्प – अबुबकर व हुजेफ सय्यद यांचा सलग रोजा उपवास

लहान वयात मोठा संकल्प – अबुबकर व हुजेफ सय्यद यांचा सलग रोजा उपवास  बीड अक्षरधाम परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – मुस्लीम समाजातील पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने अनेक धर्माभिमानी उपवास (रोजा) धरतात. मात्र, लहान वयातही या पवित्र परंपरेचे पालन करत सलग रोजा ठेवणाऱ्या दोन भावंडांचे विशेष कौतुक होत आहे. येथील मोहम्मदीया कॉलनीतील…

श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे श्री ह भ प युवा किर्तनकार प्रकाश महाराज फड यांचे कीर्तन

श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे श्री ह भ प युवा किर्तनकार प्रकाश महाराज फड यांचे कीर्तन  बीड अक्षरधाम  परळी (प्रतिनिधी)विसाव्या शतकातील महान संत विभुती सद्गुरू संत श्री ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर श्रीक्षेत्र चाकरवाडी यांच्या पवित्र पावन दरबारा मध्ये शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी संध्याकाळी सात ते नऊ या…