बीड अक्षरधाम चौसाळा प्रतिनिधी – दि.07/ ऑक्टोबर 2025 रोजी रोकडेश्वरी आई देवी जाग्रत देवस्थान मंदिराचा जीर्णोध्दार व कलशरोहन कार्यक्रम श्री.नरेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविक भक्ताच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी ह भ प श्री संजय महाराज पाचपोर यांचे किर्तन सकाळी 10 ते 12.30 वाजेपर्यंत झाले त्यानंतर मानेवाडी.ता.जि.बीड, पिंपळगाव घाट,वाढवणा, रूईगव्हान, माळेवाडी व पंचक्रोशीतील आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी देवस्थान च्या वतीने मोफत आरोग्य शिबीर ठेवण्यात आले होते व यावेळेस 172 रक्त दात्यांनी रक्तदान केले व पंचक्रोशीतील आलेल्या हजारो भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे-भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस प्रमुख उपस्थिती लातूर जिल्ह्य़ातील किल्लारी येथील महंत श्री योगी सोमवार नाथजी,श्रीयोगी स्मशेर नाथजी,श्रीयोगी सिद्धेश्वर नाथजी,श्रीयोगी बद्रीनाथजी व बीड कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सौ.सरलाताई कामराज मुळे, पोलीस निरीक्षक श्री अजिनाथ काशिद साहेब,डाॅ सारीका योगेश क्षीरसागर, चौसाळ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव मोटे साहेब मा जि प सदस्य विलास महाराज शिंदे, अशोक लोढा,बबनराव गवते,अँड गणेश मोरे,शैलेश सुरवसे,नितीन धांडे,मा सभापती काकासाहेब जोगदंड,बाळासाहेब राऊत, युवा नेते दिनेश साठे,धाराशिव मा जि प सदस्य महादेवराव आखाडे व अन्य सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.रोकडेश्वरी आई देवी मंदिर देवस्थान येथे आलेल्या प्रमुख मान्यवरांचे देवस्थान च्या वतीने स्वागत करण्यात आले.व देवस्थान येथे आलेल्या सर्व भाविक भक्ताचे पांडुरंग आवारे-पाटील यांनी आभार मानले

