दिव्यांगांच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देणार -आदित्य जीवने
दिव्यांगांच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देणार -आदित्य जीवने बीड, दिनांक 3 (जिमाका) : दिव्यांगासाठी विविध शासकीय योजना आहेत. त्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी आज केले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जीवने…