पालकमंत्री धनंजय मुंडे यांना काळा झेंडा दाखवून माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी निषेध नोंदवला

पालकमंत्री धनंजय मुंडे यांना काळा झेंडा दाखवून माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी निषेध नोंदवला

पालकमंत्री धनंजय मुंडे यांना काळा झेंडा दाखवून माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी निषेध नोंदवला

बीड प्रतिनिधी – माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी पालकमंत्री तथा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला काळा झेंडा दाखवून निषेध नोंदवला आहे तीन वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन मागणीचे निवेदन देऊन आपल्याकडून काम होत नाही. याचा तीव्र निषेध व रोश व्यक्त केला.

एक वर्षापासून माजी सैनिक प्रकाश वाघमारे हे शिवनी येथील गट नंबर 662 येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. पोलीस व आरोपी यांनी संगणमताने शेतातील घर शेड पाडले,अँगल कट केले, त्याची चोरी ही केली मात्र या प्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही, या सर्व घटनेचे पुरावे वाघमारे यांच्याकडे व्हिडिओ स्वरूपात आहेत पोलीस प्रशासन हे अपरार्ध्यांना पाठीशी घालत आहे.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी पालकमंत्री तथा कृषीमंत्री याचे आज जिल्हाधिकारी उपोषणाला बसलेल्या लोकांची भेट घेत पुढे आले त्यावेळी भेट देते प्रसंगी खिशातील काळा झेंडा फडकवत निषेध केला. त्यांच्या सोबतच्या सुरक्षारक्षकांनी तो ताब्यात घेतला. यावेळी पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची चांगलीच पाचवा धरण बसली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या बेमुदत धरणे आंदोलनाची चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *