कुरेश कॉन्फ्रेंसचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन 4 एप्रिल रोजी; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन – कादर पाशा कुरेशी

कुरेश कॉन्फ्रेंसचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन 4 एप्रिल रोजी; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन – कादर पाशा कुरेशी

 

बीड अक्षरधाम परळी वैजनाथ / प्रतिनिधी – कुरेश बिरादरीच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच व्यापार क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्याच्या उद्देशाने कुरेश कॉन्फ्रेंस (Regd.) यांच्या वतीने चौथे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार, दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राष्ट्रवादी भवन, मलकापूर रोड, बुलढाणा येथे पार पडणार आहे.

 

या महत्त्वपूर्ण अधिवेशनात राज्यभरातून समाजाचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, बिरादरीसमोरील विविध ज्वलंत प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करून ठोस निर्णय घेतले जाणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि व्यापार क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर विशेष मंथन होणार असल्याची माहिती कादर पाशा कुरेशी, जिल्हाध्यक्ष कुरेश कॉन्फ्रेंस (Regd.) बीड यांनी दिली.

 

अधिवेशनाचे विशेष आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील कुरेशी समाजातील नुकतेच निवडून आलेल्या नवनियुक्त नगरसेवकांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच समाजाच्या राजकीय सहभाग आणि प्रतिनिधित्व वाढविण्याबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा होणार असून, हे अधिवेशन समाजाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

 

दरम्यान, कादर पाशा कुरेशी (जिल्हाध्यक्ष, कुरेश कॉन्फ्रेंस बीड तथा नगरसेवक, परळी वैजनाथ) यांनी समाजातील सर्व बांधवांना आवाहन केले आहे की, या अधिवेशनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा आणि समाजाच्या सशक्तीकरणासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *