मनोज दादा जरांगे पाटील यांनी पाठिंबा देण्यासाठी रविवारी हजारो शेतकरी आणि माजी सैनिक अंतरवली सराठीला लाॅग मार्च-नारायण अंकुशे

मनोज दादा जरांगे पाटील यांनी पाठिंबा देण्यासाठी रविवारी हजारो शेतकरी आणि माजी सैनिक अंतरवली सराठीला लाॅग मार्च-नारायण अंकुशे

*मनोज दादा जरांगे पाटील यांनी पाठिंबा देण्यासाठी रविवारी हजारो शेतकरी आणि माजी सैनिक अंतरवली सराठीला लाॅग मार्च-नारायण अंकुशे*

*भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना २८८ जागा मनोज दादा जंरागे पाटील* *यांच्या नेतृत्वाखाली* *लढविण्याची तयार..*

पुणे- भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटनेचा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पूर्वीही पाठिंबा होता आताही आहे आणि भविष्यात हि राहणार असून याकरिता मनोज दादा जरांगे पाटलांनी विधानसभा लढविण्याचा जो निर्णय घेतला आहे. यास आमचा पाठिंबा असून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना विधानसभांच्या २८८ लढविण्यास तयार असून याला पाठिंबा देण्याकरता रविवारी आम्ही हजारो शेतकरी माजी सैनिकासह अंतरवर्ली सराटी येथे जाणार असून जरांगे पाटील यांच्या समवेत सविस्तर चर्चा करून पुढची दिशा ठरवून विधानसभेची निवडणूक लढवू असे भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले आहे..

प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकार जनतेची विविध प्रकारच्या बोगस योजना करून दिशाभूल करीत असून पैसे देऊन मत विकत घेण्याचा ही मोठी योजना आहे. तरुणांच्या बेरोजगारी बाबतीत राज्य सरकार कुठलेही ठोस पाऊल उचलीत नसून गेल्या अनेक वर्षभरापासून नौकरी नसल्यामुळे निराशा पोटी कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केले आहेत. हिच भूमिका शेतकऱ्याबाबत सुद्धा सरकारचे असून शेतीमालाला दुधाला ऊसाला कापसाला हमीभाव देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता ही लढाई जनतेने आपल्या हातात घेतली असून मनोज दादा जरांगे पाटीलाने ठरविले तर स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना, विश्वरत्न बौद्ध महासभा, शेतकरी संघटना, भारतीय जवान किसान पार्टी सकल मराठा संघटना, आदीना एकत्र करून सक्षम तिसरी आघाडी उभी राहू शकते आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बेरोजगारांच्या माता-भगिनींच्या विचाराचे सरकार स्थापन करू शकते यात कोणाचे दुमत नसून आता फक्त घोषणा करणे बाकी आहे याकरीताच आम्ही हजारो शेतकरी आणि आजी माजी सैनिक,

माता-भगिनी,तरुण-तरुणी आणि बेरोजगार यांच्यासह रविवारी आंतरवाली सराटी येथे मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जाणार असून यातून महाराष्ट्राला नवी दिशा मिळणार आहे असे नारायण अंकुशे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *