महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन
बीड अक्षरधाम प्रतिनिधी – महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बोधगया हे बौद्धांचे पवित्र स्थान आहे. हे बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे म्हणून,येथे मोठ्या संख्येने उपोषण करणारे पुज्य भंते गन आणि बौद्ध उपासक- उपासिका यांना पाठिंबा म्हणून दि. 28/02/2025 रोजी पुज्य भंते आचलानंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यु.एस वाघमारे,पी.व्ही बनसोडे,अशोक ठोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबोधी महाविहार साठीचा बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 रद्द करून सदर बुद्धविहार बौद्धाच्या ताब्यात व्यवस्थापन देण्यात यावे याची आग्रही न्याय मागणी साठी जिल्हाधिकारी बीड यांचे मार्फत बीड शहरातील बुद्ध विहार परिसरातील 764 उपासक-उपासिका तसेच सामाजिक संघटना आंबेडकर अनुयायी यांच्या सह्यांचे निवेदन भारताचे महामहिम राष्ट्रपती,पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री मुख्यमंत्री बिहार राज्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.

