राज्याच्या गृहराज्यमंत्र्याचा मोबाईल मिसिंग की
बीडच्या गुन्हेगारांनी मंत्र्याला ट्रायल दाखवली
सामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची- उल्हास गिराम
बीड अक्षरधाम -(प्रतिनिधी ) महाराष्ट्रराज्यचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा काल मोबाईल गहाळ झाल्याची माहिती आज मिळाली. मोबाईल गहाळ झाला की योगेश कदम यांना बीडच्यागुन्हेगारांनी ट्रायल दाखवली, समोर मीडिया उपस्थित असतांना मोबाईल गहाळ होतो, केज पोलीस स्टेशनला तशी मिसिंग तक्रार संबंधित मंत्र्याने दिली आहे असे समझले. जर राज्याचा गृहराज्य मंत्रीही बीड मध्ये असुरक्षित असेल तर जिल्ह्यातील जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची, असा उपरोधीक टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी गृहराज्यमंत्र्याला लागवाला आहे.
बीड मध्ये किती गुन्हेगारीता वाढली आहे यांची प्रचिती काल गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी अनुभवली आहे. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देऊन त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा हीच अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आहे. परंतु या महायुती सरकार ने गुन्हेगार पोसले आहेत. न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवायची हाच गहन प्रश्न असल्याचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम सांगितले.