क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने 18 तास अभ्यास उपक्रम
बीड अक्षरधाम प्रतिनिधी (दि .४) – येथील तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १८ तासांचा अभ्यास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा अनोखा कार्यक्रम १० एप्रिल २०२५ रोजी तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात पार पडणार आहे.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये दीर्घकालीन एकाग्रता, आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय विकसित करण्यासाठी राबविला जात असल्यामुळे, यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी १८ तास सतत अभ्यास करणे अपेक्षित आहे. सहभागींसाठी विनामूल्य नाष्टा-जेवण व्यवस्था महाविद्यालयात करण्यात येणार असून या अनोख्या शैक्षणिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ९ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत नोंदणी करणे गरजेचे आहे.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी सकाळी ६.०० ते मध्यरात्री १२.०० या कालावधीत पूर्ण वेळ थांबणे अनिवार्य असून केवळ पूर्व नोंदणी केलेल्यांनाच अभ्यास सत्रात प्रवेश मिळेल तसेच ऐनवेळी येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या ९३१०६६६६५१, ९३१०६६६६५२ या नंबर वर संपर्क साधावा किंवा महाविद्यालयात प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहन तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.