सूर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर उर्फ भैय्यासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

सूर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर उर्फ भैय्यासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

बीड प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपुत्र ज्यांना सूर्यपुत्र यशवंत भीमराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर म्हणून ओळखतात त्यांचा 17 सप्टेंबर स्मृति दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा बीड येथील मुख्य कार्यालयात अगोदर कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम तथागत महात्मा गौतम बुद्ध,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे धूपदीपाने व पुष्पहार अर्पण करून व बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.त्यानंतर सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला  समता सैनिक तथा  संपादक बालाजी जगतकर, भारतीय बौद्ध महासभेचे महालिंग निकाळजे, सचिन हराळे, अनिल बोरडे, गौतम खेमाडे, पद्मिनी बाई गायकवाड, अवंतिका वासनिक, शोभाताई साळवे सरस्वती जाधव, राजेंद्र ससाने, हनुमंत कांबळे,उमाजी आठवले,धर्मराज मजमुले आदी सह अनेक जण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *