शेतकरी मित्र राजेंद्र मस्केंच्या बैलगाडा शर्यतीने इतिहास घडवला..! मराठवाडा केसरीचा मानकरी आर्यन गणेशशेठ फिरंगे ( बकासुर – सर्जा ) ..! 

शेतकरी मित्र राजेंद्र मस्केंच्या बैलगाडा शर्यतीने इतिहास घडवला..!  मराठवाडा केसरीचा मानकरी आर्यन गणेशशेठ फिरंगे ( बकासुर – सर्जा ) ..! 

शेतकरी मित्र राजेंद्र मस्केंच्या बैलगाडा शर्यतीने इतिहास घडवला..!

मराठवाडा केसरीचा मानकरी आर्यन गणेशशेठ फिरंगे ( बकासुर – सर्जा ) ..!

 

( बीड प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या वतीने बीड येथे आयोजित भव्य मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत सुमारे पन्नास हजार प्रेक्षकांच्या साक्षीने संपन्न झाली. राजेंद्र मस्के यांच्या नियोजनातून बैलगाडा शर्यतीचे मैदानाला भव्य स्वरूप आले. उत्तम व पारदर्शकपणे स्पर्धांचे नियोजन करून स्पर्धकांना सन्मानपूर्वक शर्यतीत संधी दिली. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी या मैदानाला जत्रेचे स्वरूप आले होते. मराठवाड्यातील बीड येथे झालेल्या मराठवाडा केसरी मैदानाने इतिहास घडवला.

 

प्रथम बक्षीस सोनालिका ट्रॅक्टर, – आर्यन गणेशशेठ फिरंगे धनगरवाडी ता. बीड यांच्या बकासुर व सर्जा बैलजोडीने साहसाने शर्यत जिंकून मराठवाडा केसरीचा मान पटकवला. तर पुढील बैलगाडा स्पर्धकांनी सहा रोख बक्षिसांचा मान पटकावला. द्वितीय बक्षीस, संजय जाधव – जालना, तृतीय बक्षीस – बापासाहेब इंदुरे, बीड, चौथे बक्षीस – बापूराव चव्हाण, नीरा, पाचवे बक्षीस – शिला गणेशशेठ फिरंगे, धनगरवाडी, सहावे बक्षीस- बुरा भाऊ शिंदे चाळीसगाव, सातवे बक्षीस – समीर पटेल ,संभाजी गीते शंकरापूर सर्व विजेत्यांचा ढाल, पुष्पगुच्छ व पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

 

महाराष्ट्रातील जळगाव, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, इंदापूर, नगर, कल्याण, परतूर, ठाणे, सासवड, पुरंदर. बारामती, फलटण, नाशिक, माळशिरस, सांगली आदीसह बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी सहभाग नोंदवला. सकाळी 08.00 वाजल्यापासून सायंकाळी 07.00 वाजेपर्यंत बैलगाडा प्रेक्षकांची तोबा गर्दी मैदानावर होती. तळपत्या उन्हात लोकांनी शर्यतीचा आनंद लुटला. शुभारंभासाठी महंत शिवाजी महाराज, नारायणगड संस्थान नारायणगड, महंत शांतीब्रह्म नवनाथ बाबा, गोरक्षनाथ टेकडी संस्थान, महंत स्वामी योगिराज महाराज रामगड संस्थान, माजी आमदार राजेंद्र जगताप, सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, अशोकराव हिंगे, कल्याण काका आखाडे, नारायणराव शिंदे, सोमनाथराव माने, दिलीपशेठ लोढा, रमेश चव्हाण, लक्ष्मण काटे, ओमप्रकाश गिरी, गणेश उगले, भाऊसाहेब डावकर आदि मान्यवर उपस्थित होते. ही शर्यत यशस्वी करण्यासाठी राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. शर्यतीचे नियोजन समन्वय व सूत्र संचालन मारुती तिपाले यांनी केले.

क्षणचित्रे –

• दीडशे बैलगाडा धारक रात्रीच मुक्कामी

• सकाळी 08 वाजल्यापासून हौशी प्रेक्षकांनी गर्दी केली.

• महाराष्ट्रातल्या नामांकित बकासुर, सर्जा, सोन्या, हिंदकेसरी बब्या, पिस्टल, अर्जुन, लखन बीडच्या मैदानावर धावले.

• शर्यत पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली, मैदानाला जत्रेचे स्वरूप आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *