विजय जाहेर यांची महाराष्ट्र महिला खो – खो संघाचे प्रशिक्षकपदी नियुक्ती खेलो इंडिया महिला लिगसाठी निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन

विजय जाहेर यांची महाराष्ट्र महिला खो – खो संघाचे प्रशिक्षकपदी नियुक्ती     खेलो इंडिया महिला लिगसाठी निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन

विजय जाहेर यांची महाराष्ट्र महिला खो – खो संघाचे प्रशिक्षकपदी नियुक्ती

 

खेलो इंडिया महिला लिगसाठी निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन

 

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल शाळेतील क्रीडाशिक्षक तथा बीड जिल्हा खो -खो संघटनेचे सचिव, राष्ट्रीय खो -खो खेळाडू विजय जाहेर यांची खेलो इंडिया महिला खो-खो लीगसाठी महाराष्ट्र मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वडोदरा, गुजरात येथे २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय खेलो इंडिया महिला लिगसाठी मुलीचा संघ घोषित करण्यात आला आहे . या संघाच्या प्रशिक्षक पदी विजय भागवत जाहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्यांचे अभिनंदन होत आहे . विजय जाहेर यांचे महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे आश्रयदाता तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, खो-खो संघटनेचे अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्यासह महाराष्ट्राचे कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार अमरसिंह पंडित, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक रणवीर पंडित, महाराष्ट्र खो- खो संघटनेचे ज्येष्ठ संघटक शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. शेळके जे पी, बीड जिल्हा खो – खे संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश शेळके, रमेश भाऊ शिंदे, तसेच न्यू हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक अंकुशराव तौर, योगेश सोळशे, मनोज जोगदंड, विनोद शिंदे, कछवाय मॅडम, प्रफुल हाटवटे यांच्यासह शालेय समितीचे सर्व सदस्य, पंच, प्रशिक्षक व क्रीडाशिक्षक आदींनी विजय भागवत जाहेर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *