बीड अक्षरधाम प्रतिनिधी:-‘मरहूम अतहर बाबर साहब शहर विकास आघाडी व बीड शहर बचाव मंच’ च्या पुरस्कृत ‘आप’च्या अधिकृत उमेदवार सौ. वृशालीताई नितीन जायभाये यांनी आज नगराध्यक्ष पदासाठी व वार्ड क्रमांक 13 तील एस सी महिला राखीव या जागेसाठी ‘आम आदमी पार्टीच्या’ “झाडू” या अधिकृत चिन्हावर नगरसेवक पदाच्या पहिल्या टप्प्यातील 11 उमेदवारांसह नामनिर्देशन पत्र/अर्ज दाखल केला. यावेळी ‘मरहुम अतहर बाबर साहब शहर विकास आघाडी व बीड शहर मंचाचे’ निमंत्रकअध्यक्ष प्रवर्तक नितिन जायभाये हे प्रमुख उपस्थितीत होते. बीड नगर परिषदेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक प्रक्रिया चालू आहे. बीड शहर बचाव मंच व त्यांचे मित्र पक्ष यांनी मिळून नगरपरिषद निवडणूक लढवण्याचा निश्चित निर्णय घेऊन डाव्या विचारांच्या सर्व पक्ष संघटनांना सोबत घेत “अतहर बाबर साहब शहर विकास आघाडी” तयार केली आहे. तरी पहिल्या 150 दिवसांमध्ये बीड नगरपालिका शहरातील नागरी समस्या
हमीने सोडवण्यासाठी विकासाच्या दृष्टीने कशी दिशा घेणार आहे व “मरहूम अथहर बाबर साहब यांच्या स्वप्नातील बीड नगरी” साकारण्याच्या अनुषंगाने बीड शहर बचाव मंच कशा पद्धतीने काम करणार आहे या दृष्टीने ने “हमीनामा” प्रकाशित केला आहे ज्यामध्ये
१)नियमीत स्वच्छता मोहीम राबवून कचरा व्यवस्थापन व व्यवस्थापन प्रकल्प हमीने यशस्वी करण्यात येतील.
२) शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या तसेच शुद्ध पाण्याची समस्या हमीने सोडविण्यात येईल.
३) बारगळलेले पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना हमीने केल्या जातील.
४) पूर्ण शहरामध्ये विद्युत पथदिवे लावून शहर अंधकार मुक्त करण्याची मोहीम हमीने राबविण्यात येईल.
५) शहरामध्ये दुर्गंधी व रोगराईसाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना हमीने केल्या जातील.
६) मोकाट जणावरे मुक्त शहर योग्य त्या उपाय योजना करुन हमीने केल्या जाईल.
७) पूर्ण शहरामध्ये रस्ते व नाल्या करण्यासाठी महामोहीम हाती घेतली जाईल.
८) नगर पालीकेचा कारभार आणि व्यवहार पूर्ण पणे पारदर्शक व सार्वजनिक स्वरुपाचा हमीने केला जाईल.
९) नगर पालीकेची विकासकामे तांत्रिक दृष्ट्या प्रमाणित, १००% दर्जेदार व दुरदृष्टी ठेऊन हमीने केल्या जातील.
१०) नगर पालीकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन प्रश्न, आवश्यक ती नोकर भरती, निलंबीत कर्मचाऱ्यांचे प्रश्न संवेदनशिल पणे हताळण्यात येऊन, योग्य त्या उपाय योजना करुन हमीने निकाली काढण्यात येतील.
११) पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त कारभाराचे ध्येय साध्य करुन शहर सुशोभीकरणासह, सर्व धार्मिक स्थळांचे जतन, लहान थोरांसाठी अद्यावत दर्जेदार उद्याने निर्मिती प्रकल्प, ठिकठिकाणी गरजेनुसार अद्यावत स्वच्छता गृहे निर्मितीसाठी तसेच मुलभुत नागरी समस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य त्या उपाय योजना हमीने हाती घेतल्या जातील.
१२) नगरपालीकेच्या माध्यमातुन विशेष तज्ञ कल्पकतेचा वापर करुन नवीन रोजगार निर्मितीसाठी सातत्याने व हमीने उपाय योजना केल्या जातील.
अशा पद्धतीने,
बीड शहर बचाव मंच व मित्र पक्ष यांची यांची “मरहूम अतहर बाबर साहब” शहर विकास आघाडी आपल्या सेवेत रुजू आहे.

