
बीड अक्षरधाम प्रतिनिधी – आगामी होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीड शहरात काँग्रेस स्वबळावर संपूर्ण जागा लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष परवेज कुरेशी यांनी दिली आहे. पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राजीव गांधी, खा. रजनीताई पाटील,माजी मंत्री अशोकराव पाटील, आदित्य पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या आदेशाने बीड नगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर संपूर्ण जागेवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष परवेज कुरेशी यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.
35 वर्षे ज्यांनी नगरपालिका लुटली आहे विकासाच्या नावाखाली खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यांना आता घरी बसण्याची वेळ आली आहे. विकासाच्या मुद्द्यावर व जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी बीड शहर काँग्रेसने आता कंबर कसली आहे.
बीड नगरपालिकेतील एक अधिकार शाही संपुष्टात आणण्यासाठी, घरणे शाहीला मूठ माती देण्यासाठी, काँग्रेस संपूर्ण ताकतीनिशी नगराध्यक्ष तसेच सर्व प्रभागातील निवडणुका लढणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. लवकरच बीड शहरात पक्षश्रेष्ठीच्या नेतृत्वाखाली व्यापक बैठक घेणार असल्याची माहिती ही त्यांनी सांगितली. या महत्वपूर्ण बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांचे मनोगते ऐकून घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी सांगितली.

