राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अशोक वाघमारे यांचे नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अशोक वाघमारे यांचे नियुक्ती

 

बीड अक्षरधाम प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी अशोक भाऊ वाघमारे यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार यांच्या आदेशाने व

बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या शिफारशीने अशोक भाऊ वाघमारे यांना छत्रपती संभाजी नगर येथील पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ मगरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

अशोक भाऊ वाघमारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षात एकनिष्ठ राहून काम करत आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात मागासवर्गीय विभागाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी काम केले आहे. त्यानंतर त्यांना कामाची पावती म्हणून पक्षाने जिल्हा सरचिटणीस पदी निवड करून काम करण्याची संधी दिली. त्यांच्या याच एकनिष्ठतेचे फळ म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *