सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला: ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने निषेध,  हल्लेखोराला देशद्रोही घोषित करा- पॅंथर नितीन सोनवणे

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला: ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने निषेध,   हल्लेखोराला देशद्रोही घोषित करा- पॅंथर नितीन सोनवणे

 

बीड अक्षरधाम प्रतिनिधी, –  सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश माननीय भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने देशभरात खळबळ उडाली असताना, ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. सेनेचे प्रमुख नितीन सोनवणे यांनी हल्लेखोर वकील राकेश किशोर याला ‘देशद्रोही’ घोषित करत, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना भारतीय लोकशाही आणि संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर हल्ला असल्याचे म्हणत, सोनवणे यांनी मनुवादी विचारसरणीचा ‘आतंकवादी चेहरा’ असलेल्या या व्यक्तीला ठेचण्याची गरज असल्याचे सांगितले.सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (६ ऑक्टोबर) घडलेल्या या घटनेत, वकील राकेश किशोर या व्यक्तीने सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, ही कृत्य खजुराहो येथील जावरी (वामन) मंदिरातील भगवान विष्णूच्या जीर्णावस्थेतील मूर्तीच्या जीर्णोद्धाराच्या याचिकेवरील १६ सप्टेंबरच्या निर्णयाशी निगडित असल्याचा अंदाज आहे. या निर्णयात सरन्यायाधीश गवई यांनी सनातन धर्माशी संबंधित टिप्पणी केली होती, ज्यामुळे किशोर याला राग आल्याचे सांगितले जाते. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करून किशोरला ताब्यात घेतले, तर सरन्यायाधीश गवई यांनी या घटनेचे गांभीर्य नसल्याचे सांगत कामकाज सुरू ठेवले आणि कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले. गवई यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे होता.

मात्र, बार कौन्सिल ऑफ इंडियाने किशोर याला प्रॅक्टिसमधून निलंबित केले आहे.ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी म्हटले, “सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर न्यायालयात हल्ला करण्याचा प्रयत्न हा भारतीय लोकशाहीवरील हल्ला आहे. हे संविधानातील लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय यांच्यावर थेट प्रहार आहे. मानसिक विकृत असलेला हा किशोर नामक व्यक्ती चातुर्वर्ण व्यवस्था आणि मनुस्मृति ही संविधानाने गाडलेली परंपरा पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतोय. न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्या मंदिरात मनुवादी विचारसरणीचा हा आतंकवादी चेहरा आहे. याला वेळीच ठेचणे ही सर्व भारतीयांची प्राथमिकता आहे.”सोनवणे यांनी पुढे सांगितले, “या विकृत मानसिकतेच्या किशोरला सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात प्रवेश बंदी घालावी आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी आमची मागणी आहे. या व्यक्तीला जेथे आढळेल तेथे त्याचे तोंड काळे करून समाजाने बहिष्कृत करावे.” पॅंथर सेनेच्या या भूमिकेने दलित आणि बहुजन समाजातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, विविध संघटनांकडूनही या मागणीला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.या घटनेवर दिपक भाई केदार या नेत्यांनीही निषेध व्यक्त केला असून, देशभरात न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. पॅंथर सेनेच्या या जाहीर निषेधाने हा मुद्दा आणखी उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *