क्रिकेट व फुटबॉल खेळाडूंना हक्काचे मैदान मिळालेच पाहिजे.. बीड शहर बचाव मंच व बीडकरांची अजितदादांकड एकच मागणी..

क्रिकेट व फुटबॉल खेळाडूंना हक्काचे मैदान मिळालेच पाहिजे..  बीड शहर बचाव मंच व बीडकरांची अजितदादांकड एकच मागणी..

बीड अक्षरधाम प्रतिनिधी – बीड जिल्हा स्टेडियम मध्ये क्रिकेट व फुटबॉल या खेळांसाठी पूर्ववत हक्काचे मैदान तयार करून उपलब्ध करून द्या या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्हा कार्यालयासमोर बीड शहरातील तमाम शेकडो खेळाडूंच्या तसेच पालक, प्रशिक्षक व असंख्य क्रीडाप्रेमींच्या समवेत बीड शहर बचाव मंचाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बीड शहरातील मध्यवर्ती भागातील बीड जिल्हा स्टेडियम हे सुरुवातीपासूनच ऑल जनरल स्पोर्ट्स या पद्धतीने सातत्याने उपयोगात आहे. या स्टेडियम खेरीज बीड शहरामध्ये खेळाडूंच्या सरावासाठी कुठेही सोयीस्कर पद्धतीचे मैदान उपलब्ध नाही. याच मैदानाने ‘सचिन धस’ सारखे विद्यापीठ स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळणारे मोठमोठे नामवंत शेकडो खेळाडू घडवले आहेत. वय वर्ष 4 पासून ते 25 पर्यंत 500 ते 800 खेळाडू नियमित दररोज येथे सराव करत असतात. अंडर 12,14,15,19,23 वयोगटातील राज्यस्तरावरील खेळाडू येथे सराव करतात. 60 ते 70 खेळाडूंनी विद्यापीठ ते राष्ट्रीय संघापर्यंतच्या सामन्यात प्रतिनिधित्व केलेले आहे. ॲथलेटिक्स व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील खेळांसोबतच क्रिकेट व फुटबॉल साठी देखील उत्कृष्ट अभियांत्रिकी तंत्राचे सहाय्य घेऊन कल्पकतेने निश्चित करून पूर्ववत हक्काचे मैदान कायम देता येईल. क्रिकेटच्या नेट प्रॅक्टिसिंग साठी येथे मैदान देणे शक्य आहे. तरी शासनाने, प्रशासकीय तज्ज्ञाने याचा सखोल अभ्यास करावा. बीड शहर बचाव मंच तसेच बीड शहरातील जनतेचा, खेळाडूंचा व क्रीडा प्रेमींचा शहरात होणाऱ्या क्रिडा विकास प्रकल्पाला अजिबात विरोध नाही, याउलट पूर्ण समर्थनच आहे. बीड शहरामध्ये उभारल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक क्रीडा प्रकल्पामध्ये इतर सर्व खेळांसोबतच क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांनाही त्यांचे हक्काचे मैदान निश्चित करून कायमस्वरूपी देण्यात यावे या प्रमुख मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले. यावेळी बीड शहर बचाव मंचाच्या वतीने प्रा डि.जी. तांदळे सर, कॉ. नितीन जायभाये, कॉ.ज्योतीराम हुरकुडे, चंद्रकांतभाऊ हुरकुडे, मोमीन मुशरफ मझहर, जीशान फारोकी,इजहानभाई,कायदेशीर सल्लागार ॲड.अनिल बारगजे, ॲड.नितीन वाघमारे, सीनियर प्रशिक्षक अजहर शेख,परवेझभाईसर, लोकप्रिय क्रिकेटर संजय (तात्या) धस, सुनील वाघमारे, नासेर तांबोळी, राहुल जाधव, शैलेश जाधव, संतोष खेडकर, अनिल वाघमारे, सचिन वडमारे, राजेश धनधाव, हनुमान मागधरे, सुनील नागरगोजे, पठाण सर, बालाजी घरत, प्रकाश गालफाडे,अविनाश खेडकर, संजय कुलकर्णी, भारत मुंजाळ, हनुमान पवळ, युवराज ससाने, राजेंद्र घोडके आदी अनेक सर्व क्रीडा क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तींची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *