
बीड अक्षरधाम प्रतिनिधि – मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषद महाराष्ट्र संविधान अमृत वर्षत सा.स.अण्णाभाऊ साठे व महाकवि वामन दादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्य स्तरावरील कविसंमेलनाचे उद्घघाटन करताना भारत सातपुते बोलताना म्हणाले कि येथील प्रचलित समाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या समग्र समस्या आंबेडकरवादा आधारेच सुरु शकतात. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मानवी कल्याणार्थ दृष्टिकोनातुन संविधानात सकारात्मक संशोधन करुन अद्ययावत करावे लागेल.संविधानाची प्रभावी आंमलबजाणनी करताना योग्य लोकशाही पध्दतीतीचा अवलंब करावा लागेल.त्यासाठी आम्हाला फक्त सांगुन चालणार नाही तर तो आम्हाला आचरणात आणावा लागेल त्या शिवाय सामाजिक परिवर्तन प्रक्रिया पुर्णत्वास जाणार नाही.प्रमुख पाहूणे प्रा.डॉ.किर्तीकुमार मोरेसरांनी उपस्थित साहित्यिक, साहित्य रसिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि,आज भारतीय नागरिकांमध्ये संविधानिक व संविधान लोकशाही बाबतीत पाहिजे त्या प्रमाणात जागृती नसल्यामुळे नागरिक आपली योग्य भुमिका साकारीत नाहीत.म्हणून संविधानिक अधिकार-कर्तव्या प्रति नागरिकात सकारात्मक भावना रुजवावी लागेल. त्यासाठी साहित्यिकांनी मानवतावाद हे आंबेडकरी साहित्याचे प्राणतत्व आहे हे समजुन घेउन उपेक्षित वंचितांच्या वेदनांना उपाययोजणेसह शब्दात साकारावे आसे प्रतिपादन कॆले.या प्रसंगी नियोजित “मानवतावाद पेलताना ” कविता-संग्रहाचे मान्यवरांच्या हास्ते व उपस्थितांच्या साक्षीने प्रकाशन करण्यात आले.मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषद महाराष्ट्र चे अध्यक्ष धी.चंद्रप्रकाश जी.शिंदे यांनी परिषदेचे प्रयोजन सांगुन साहित्यिकांनी स्वतःला बौध्दिक, वैचारिक, मानसिक दृष्ट्या अद्ययावत होऊन सामाजिक परिवर्तन प्रक्रियेत सक्रिय होण्याचे अव्हाण केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष छगन घोडके (उपाध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.महा.) हे अध्यक्षीय समरोप करताना वक्त्यांच्या वक्तव्याचा आडावा घेऊन साहित्यिक संघ शक्तीच संविधानास व लोकशाहीस फलद्रुप होण्यास सहाय्यभुत ठरेल.प्रस्तावित मुरलीधर रणखांब (जिल्हसचिव मा.प्र.सृ.सा.प.परभणी )यांनी प्रभावीपणे केले. सुत्रसंचालन धी.डॉ.हरिष रणबावळे (राज्य कार्यकारिणी सदस्य मा.प्र.सृ.सा.प.महा.)यांनी उत्कृष्ट पणे केले.या सत्राचे आभार धी.एम बी गोमुकले तालुका सचिव मा.प्र.सृ.सा.प.गंगाखेड यांनी केले. कविसंमेलनासाठी महाराष्ट्रातील आनेक ठीकाणाहुन आलेल्या प्रतिभासंपन्न प्रसिद्ध कविचा सहभाग झाला होता.अमरावतीचे धी.देविलाल रौराळे,सांगलीचे धी.सुजीत कांबळे,भावेश साबळै, काटे,पुण्याचे धी. सुनिल गायकवाड, हिंगोली चे बबन मोरे,प्रकाश भालेराव,शेख मनसब शाह,समाधान लोकर,धम्मानंद भगत,परभणीचे प्रा.यशवंत मकरंद, अहमदपुरच्या रंजना गायकवाड, बीडचे प्रा. संजय कांबळे,एडवोकेट काकासाहेब सोनवणे, परळीचे बा.सो.कांबळे,गंगाखेड चे डॉ.यशवंत मस्के,लक्ष्मण वावळे,प्रा.भगवान गायकवाड, पांडुरंग काळे , इ. प्रतिभासंपन्न प्रसिद्ध कविनी आपल्या कविता ,गेय कवितेतुन सभागृहाला डोलावले व उर्जात्मक उत्साहजनक वातावरणाची निर्मिती झाली.कविसंमेलनाचे अध्यक्ष धी.डी.जी.वाळवंटेनी(संघटक मा.प्र.सृ.सा.प.महा.) आपल्या अध्यक्षीय समरोप करताना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करुन दाद मिळवली.शेवटी तालुका अध्यक्ष मा.प्र.सृ.सा.पं गंगाखेड यांनी सर्वाचे आभार मानुन वामनदादाच्या गीताने सांगता केली.

