महिला सरपंच मोनिका इंगोले सह अनेक महिलांचा सहभाग
बीड प्रतिनिधी – आहेर धानोरा ता.जि.बीड येथील दि.28 ऑगस्ट रोजी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष आम्रपाली साबळे व टायगर ग्रुपच्या सारिका गायकवाड, सरपंच मोनिका इंगोले , कावेरी खेमाडे, छायाताई सह महिलांनी एकत्र येऊन गावात साधारणतः नऊ ठिकाणा वरून देशी दारू, हातभट्टी व चोरून विदेशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते, पोलीस व दारूबंदी प्रशासनाच्या लोकांना निवेदने देण्यात आले. त्यामुळे व्यसनाधीन तरुण व पुरुषांचे प्रमाण गावांमध्ये वाढले आहे. या मुळे गावातील पुरूष वर्ग तसेच विद्यार्थी ही दारूमुळे व्यसनाच्या मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे हा पुरुषवर्ग दारूचे सेवन केल्यानंतर घरी गेल्यावर घरातील महिलांबरोबर वाद, तंटे करत आहेत. या गावातील दारूमुळे व्यसनी झालेल्या लोकांमुळे शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थीना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांची कुचंबना होत आहे. त्यामुळे काही विद्यार्थीनी शाळा सोडल्या आहेत. गावातील दारूच्या समस्येमुळे गावातील सर्व महिलांची एकत्र येऊन उभी बाटली आडवी आंदोलन केले. गावातील दारूची उभी बाटली आडवी करण्यासाठी महिलांचे मतदान घेण्यात यावे व त्यातून दारूची उभी असलेली बाटली आडवी करून महिलांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. यामध्ये आहेर धानोरा येथील संपूर्ण महिला एकवटल्या होत्या.

