100 वर्षे मेंदू तल्लख ठेवणे शक्य – डॉ.जगदीश टेकाळे

100 वर्षे मेंदू तल्लख ठेवणे शक्य – डॉ.जगदीश टेकाळे

100 वर्षे मेंदू तल्लख ठेवणे शक्य – डॉ.जगदीश टेकाळे

बीड अक्षरधाम  प्रतिनिधी – आपण आपल्या मेंदूला आयुष्यभर तरुण, निरोगी आणि कार्यशील कसे ठेवू शकतो? अलीकडेपर्यंत याचे उत्तर सांगता येणे अवघड होते. परंतु या विषयावर संशोधन वाढत आहे, तसतसे संज्ञानात्मक घट अपरिहार्य आहे किंवा जर तुम्हाला चुकीच्या प्रकारचे जीन्स वारशाने मिळाले तर मेंदूविषयक रोग तुमच्या नशिबी असणारच, याला विरोध करणारे तज्ज्ञ वाढत आहेत.

 पूर्वी असे सर्वमान्य होते की वयाबरोबर आपले हृदय कमकुवत होईल, कर्करोग म्हणजे मृत्युदंडाची शिक्षाच आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील मधुमेहासारखी परिस्थिती टाळता येत नाही शिवाय हे आजार जडले तर त्यांचा कायमचा नायनाट करता येत नाही.

 आज आपल्याला माहीत आहे की आपले हृदय मजबूत करण्यासाठी आपण बरेच काही करू शकतो; कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास त्यावर प्रभावी उपचार केला जाऊ शकतो; जीवनशैलीतील बदल मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.

 आता चांगली बातमी अशी आहे की, विशिष्ट उपचारांमुळे आपल्या मेंदूच्या दीर्घकालीन आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो.मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. डेल ब्रेडसेन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाला स्मृतिभ्रंशावर (अल्झायमर) संशोधन करताना आढळून आले की, जीवनशैलीत आणि पोषणात छोटे पण प्रभावी बदल करून (रिकोड प्रोटोकॉल) रुग्णाची स्मृतिभ्रंशाकडे होणारी वाटचाल मंदावता येते, थांबवता येते आणि अनेक प्रकरणांमध्ये स्मृती परत मिळवण्यात यश मिळते.यासंदर्भात घेतलेल्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्षही प्रकाशित करण्यात आले असून, त्यामुळे या संशोधनाला पाठबळ मिळाले आहे. 

20 वर्षांनंतर उपचार ः- 

 अनेकांना त्रस्त करणारी सर्वात मोठी भीती म्हणजे तर्कशुद्धपणे विचार करण्याची क्षमता गमावणे, विसरणे आणि प्रियजनांना न ओळखणे ही आहे. समस्या अशी आहे की बरेच लोक अजूनही यावर तत्काळ उपचार सुरू करत नाहीत. मेंदूतील बदलांमुळे स्मृतिभ्रंश सुरू झाल्यानंतर दहा किंवा 20 वर्षांनंतर उपचार सुरू होतात. 

  अशा प्रकरणांमध्येही डॉ.ब्रेडसेन यांची उपचारपद्धती रुग्णांवर आश्चर्यकारकपणे काम करताना दिसते. रुग्णाच्या अनेक आठवणी परत येण्याबरोबरच, रुग्णांना प्रियजनांना ओळखण्यास आणि त्यांच्याशी पुन्हा संवाद साधण्यास सुरुवात करण्यापर्यंत बदल होत आहे. त्यांचे बोलणे आणि स्वतःची काळजी घेण्याची क्षमतादेखील परत येऊ शकते.

लठ्ठपणाचे दुष्परिणाम -लठ्ठपणामुळे मेंदूचे आरोग्य बिघडू शकते. मेंदूच्या पेशींचे नुकसान, पेशींच्या माहिती देवाणघेवाणीत बिघाड असे दुष्परिणाम मेंदूवर होतात. अनेक वर्षे चाललेल्या 13 संशोधनाच्या विश्लेषणानुसार मध्यम वयातील लठ्ठपणा स्मृतिभ्रंशासारख्या आजारांचा धोका जवळजवळ दुप्पट करतो असे मत डॉ.जगदीश श्रीराम टेकाळे एम.बी.बी.एस., एम.डी. मानसोपचार तज्ञ (गोल्ड मॅडॅलिस्ट)न्युरो सायकियाट्रिस्ट, व्यसनमुक्ती तज्ञ, सेक्सोलॉजीस्ट यांनी व्यक्त केले. डॉ.जगदीश टेकाळे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात साई(गावते कॉम्प्लेक्स, डी.पी.रोड,डॉक्टर लाईन,बस स्टॅण्डच्या पाठीमागे येथे उपलब्ध असतात. मो.9518551503, 9545615352

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *