जागतिक महिला दिनी बीडमध्ये रंगणार महिलांच्या व मुलींच्या कबड्डी स्पर्धा – रुक्मिणी नागापुरे 

जागतिक महिला दिनी बीडमध्ये रंगणार महिलांच्या व मुलींच्या कबड्डी स्पर्धा – रुक्मिणी नागापुरे 

जागतिक महिला दिनी बीडमध्ये रंगणार महिलांच्या व मुलींच्या कबड्डी स्पर्धा – रुक्मिणी नागापुरे 

 बीड प्रतिनिधी – कोरो एकल महिला संघटना मराठवाडा व एकल महिला संघटना 2014 पासून या संघटनेच्या कामाला सुरूवात झाली. कोरो इंडिया मुबंई च्या विश्वस्त सुजाताताई खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड मध्ये बैठक झाली यामध्ये 32 महिला एकत्रित आल्या व महिलांनी (विधवा, परीतक्ता, घटस्फोट झालेल्या, पतीने सोडलेले, पतीला सोडलेले, अपंग, पौढ कुमारी, ट्रान्स,) एकलचे प्रश्न समोर मांडले. त्यावेळी अनेक गोष्टी लक्षात घेऊन या कामाची सुरुवात कोरो इंडिया च्या सुजाताताई यांच्या सहकार्य मूळ झाली शासकीय योजना, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक हिंसाचार, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक या मुद्द्यावर काम सुरू झाले आणि आज ही संघटना मराठवाडा 4 जिल्ह्यात 11 तालुक्यातील 450 गावातील वीस हजार महिलांच्या सोबत जोमाने कार्य सुरू आहे इतकेच नाही तर महाराष्ट्र मध्ये 5 विभागात ही सुरू झाले आहे सर्व महिलांना माणूस म्हणून जगता यावे त्यांना मान सन्मान मिळावा, त्याही माणूस आहेत त्यांना देखील इतरांसारखे जगता यावे व महिलांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि समानतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली पाहिजे

आज महिलांच्या सक्षमीकरण बाबत बोललं जातं खर? तर खरच महिला आता सर्व स्वतः निर्णय घेतात का ? महिलांना मनासारखे जगता येते का? महिलांना सर्व गोष्टी चे स्वातंत्र्य आहे का? किती महिलांना स्वतः च्या सासर व माहेरच्या संपत्तीत समान अधिकार मिळालेत ? किती महिला स्वतः मनासारखा आयुष्याचा जोडीदार निवडतात? किती महिला राजकीय सत्तेत सहभाग होतात ? ज्या सत्तेत आहे त्या स्वतः निर्णय घेतात का? यासारखे असंख्य प्रश्न आहेतच ?

मग आमच्या महिलांनी ग्राउंडवर स्वतः कबड्डी कधी खेळताना दिसल्या आहेत का? म्हणून एकल महिला संघटना ही महिलांसाठी मागील 6 वर्षांपासून महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करत असते एकल महिला संघटना ही जात,धर्म, लिंग, वर्ण, न पाहता तमाम महिलांच्या साठी काम करते ती महिला आहे ती एक माणूस आहे, ती कुठल्या धर्माची का कोणत्याही जातीची, असे विचार संघटना करत नाही. विशेष या संघटना चे ब्रीद आहे ज्यांचे प्रश्न त्यांचेच नेतृत्व म्हणजे महिलांचे प्रश्न आहेत तर संघटना चे नेतृत्व ही सर्व महिलाच करतात. आमच्या महिलांना कबड्डी खेळायची इच्छा झाली आणि उठली गेली ग्राउंड वर असे चित्र दिसले कधी आम्हाला ? मनात कुठली इच्छा झाली आणि ती पूर्ण झाली अस अजून तरी दिसून येत नाही. मग सर्व महिलांचे राज्य आले अस सहज कानावर पडते. काही अपवाद वगळता पुरुष सपोट करतात हे मान्य आहे. पण जेव्हा सुरुवात झाली कबड्डी साठी तेव्हा आमच्या महिलांना सराव करायला जागा उपलब्ध होत नाही, प्रशासन मदत करत नाही? कितीही प्रयत्न केले तर अडवलं जाते मग सत्तेत, पदावर महिला असली काय व पुरुष असला काय? महिलांना वेळ नाही, साडीवर खेळताना दिसतात कारण वेशभूषा बदल करू शकत नाही ? घरातून विरोध केला जातो किती बंधने आहेत? यासाठी पुरुष व्यवस्था यांनी विचार बदलाची गरज आहे? तिला तुम्ही सपोट करून पहा मग तिला डबल ताकतीने ती संसार करेल तिला पतीचे सहकार्य जर मिळाले न त्या कुटुंबात वाद होणारच नाही. आमच्या महिलांना काही लागत नाही. ती फार संघर्षशील आहे, सहनशील आहे? कसल्याही संकटाचा सामना करण्यासाठी ती तयार असते कमी पडते ती पतीचे म्हणून प्रेमाचे 2 शब्द…

 मग आपण 21 व्या शतकात असताना शिक्षण तर घेतले पण ते डोक्यात उतरवले नाही शिक्षण पूर्ण केले आणि हक्क तर मागतो कारण आता आम्हाला कायदे माहिती झाले आहे, अधिकार माहिती झालेत पण आम्ही महिला म्हणून अजून कुठं आहोत याकडे लक्ष दिले पाहिजे. गावपातळीवर काम करत असताना आम्ही महिलांवर इतक्या मोठ्या घरातील जबाबदारी टाकली आहे की, तिला स्वतः साठी स्वतः कडे पाहायला वेळच मिळाला नाही पाहिजे असं सर्व कामाच्या थप्प्या तिच्या पुढे रचल्यात आणि मग कुठं काही महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असताना किती महिलांचा सहभाग असतो हे लक्षात येते. महिलांनी पण लक्षात घेऊन आता स्वतः साठी द्यावा माझ्यासाठी चांगले काय याचा विचार केला पाहिजे हे आयुष्य वाळूसारखं निसटून जात आहे वेळ कुणासाठी थांबत नाही स्वतःला वेळ द्यावा लागेल जगवून घेतले पाहिजे 

एकमेकांचा तिरस्कार न करता समजून घेऊन बदल करावा आपल्याला शिवरायांच्या कार्य वाचावे लागेल, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकावे लागतीलच आपण रमाई, जिजाऊ सावित्रीबाई यांचा इतिहास समजून घेतला पाहिजे आणि फक्त महिलांनी नाही तर पुरुष युवकांना सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे. नेमके काय करायचं आहे आम्हाला? कोणत्या दिशेने वाटचाल करायची हा विचार करून भविष्यात आमची पुढच्या पिढीसाठी आता जागे होण्याची गरज आहे. चांगली पिढी तयार करू या व माणसासारखे वागू या दुसऱ्याची मुलगी आई बहीण हिच्यात आपली बहीण आई, मुलगी जर पाहिली तर अत्याचार होणारच नाही आम्ही संतांच्या भूमीत जन्माला आलो आहोत तर आमचे विचार ही तेवढे मोठेच असावेत.

एकल महिला संघटना ही संविधानिक मूल्यांवर काम करताना कोणताही भेदभाव न करता सर्व महिलांना आवाहन करते जागतिक महिला दिनानिमित्त कोरो एकल महिला संघटना च्या वतीने आयोजित महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे दि 9 मार्च बीड रविवार संपर्क साधावा

रुक्मिणी नागापुरे कोरो एकल महिला संघटना 9049035415/

7385577521

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *