परळी सह बीड जिल्ह्याच्या शिरपेचात इंजि. राजू जगतकर यांच्यामुळे आणखी एक मानाचातुरा….. 

परळी सह बीड जिल्ह्याच्या शिरपेचात इंजि. राजू जगतकर यांच्यामुळे आणखी एक मानाचातुरा….. 

 

परळीच्या युवकाची थेट दुबईत बुलेट रेल्वेच्या ऑपरेशन मॅनेजर पदी निवड…

 

परळी सह बीड जिल्ह्याच्या शिरपेचात इंजि. राजू जगतकर यांच्यामुळे आणखी एक मानाचातुरा….. 

बीड अक्षरधाम प्रतिनिधी – बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळी भाग कधी ओला तर कधीच कोरडा दुष्काळ या बीड जिल्ह्याने नेहमीच पाहिला आहे. यात शेतकऱ्यांची पोरं आता शेती नको शिक्षण हवं याच दृष्टिकोनातून शिक्षणाच्या पाठी लागले आहेत मात्र शिक्षण करूनही नोकरीचा किंवा नोकरी मिळण्याच्या संधीची नेहमीच वाट बघतात मात्र कधी नोकरीचा विषय जरी आला तर भरमसाठ पैसा द्यावा लागतो. असे एक गणित सध्या बीड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या उराशी गाठ बांधली असल्याचे पाहायला मिळतात, मात्र परळीतील एका सर्वसामान्य कुटुंबातील युवकांनी या सगळ्या गोष्टीचा कोणताही विचार न करता आपल्या शिक्षणाला एक ध्येय आणि एक यशाची पायरी म्हणून शिक्षण घेत राहिला आणि तब्बल बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातुन थेट दुबईपर्यंतचा प्रवासस्थाने आपल्या संघर्षातून पार पडला परळीचे भूमिपुत्र आणि इंजिनीयर राजू श्रावणराव जगतकर हे आज महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर थेट आता नोकरी करणार आहेत ते दुबईमध्ये दुबईमध्ये जाण्याआधी त्यांनी दिल्ली व मुंबई येथे वेगवेगळ्या पदावर मेट्रो रेल्वेचे काम पाहिले आहे. याच त्यांच्या अनुभवी आणि कौशल्य पूर्व नेतृत्वाला जोपासून ठेवलं आणि याचीच संधी आता थेट त्यांना दुबई येथे मिळाली आहे दुबई येथे ते आता बुलेट रेल्वेच्या ऑपरेशन मॅनेजर पदी त्यांची दुबईच्या सरकारने निवड केली आहे.यामुळे आता बीड जिल्ह्याच्या शिरपेचावर मानाचा आणखी एक तुरा खवल्या गेला आहे. इंजि राजू जगतकरांना ही संधी मिळाल्यानंतर परळी तालुक्यात मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी जणू काही दिवाळीत साजरी केली आहे. कारण नेहमीच बीड जिल्हा हा कोणत्या ना कोणत्या वादात महाराष्ट्राने पाहिला मात्र याच बीड जिल्ह्यातील अनेक युवकांनी बीड जिल्ह्याच्या शिरपेचावर अनेक मानाचे तुरे खवले आहेत हे देखील उल्लेखनीय आहे. यामध्ये इंजि.राजू जगतकर हे बीड जिल्ह्यातील कौशल्यपूर्ण असलेले संपादक बालाजी जगतकर यांचे छोटे बंधू आहेत. यामध्ये मोठ्या बंधू व आई वडील यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या मार्गदर्शनाने राजूने आपलं ध्येय गाठलंच नाही तर परळी, बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्र किंवा देश असो या देशावर देखील आपण या देशात राहून दुसऱ्या देशात आपलं कौशल्य दाखवू शकतो हे दाखवून दिलं आहे. यासाठी इंजि राजू जगतकर यांचं परळी व बीड जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

 

चौकट 

निरोप समारंभ सत्कार 

परळी येथे इंजि. राजू श्रावण जगतकर व त्यांच्या पत्नी मुंबई मेट्रो रेल्वेस्टेशन मास्तर अपर्णा राजू जगतकर यांचा परळीतील निवासस्थानी शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे,राजेश साखरे सहशिक्षक वैद्यनाथ विद्यालय, रामकिशन सावंत, प्रमोद सावंत, श्रावणराव जगतकर, कासुबाई जगतकर,बालाजी जगतकर, केशरबाई गायकवाड, वंदना जंगले, सिद्धार्थ जगतकर, संजय जोगदंड,राज जगतकर, रावसाहेब जगतकर, ब्रिजेश जगतकर, मुकुंद जगतकर, प्रताप समुद्रसवळे, चि.सिद्धार्थ जगतकर, मिलिंद विद्यालयातील सर्व वर्गमित्र आदी दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *