ट्वींकलिंग स्टार स्कूलच्या क्रिकेट संघाचा विभागीय स्पर्धेत विजय.राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
बीड अक्षरधाम प्रतिनिधी- राज्य शिक्षण व क्रीडा संचनालय पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटमध्ये बीड शहरातील ट्विंकलिंग स्टार स्कूल च्या संघाने उपांत्य फेरीत परभणी च्या. संघावर मात करत.अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.हीच विजयाची घौडदौड चालू ठेवत परभणी संघावर मात करत अंतिम फेरीत विजय मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.फायनल मध्ये परभणी संघाने पाच ओव्हर मध्ये 21 रणाचे टार्गेट दिले होते ट्वींकलींग स्टार स्कूलच्या संघाने एकाच ओव्हर मध्येच पूर्ण केले .बॉलिंग मध्ये स्वराज साबळे यांनी दोन ओव्हर मध्ये एक ओव्हर मेडल व त्याच्या दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त दोन रन दिले दोन विकेट घेतल्या बॉलिंग मध्ये त्याला उत्कृष्ट कामगिरी केली.
विजय संघातील खेळाडू समर्थ मांगदरे , रुद्रप्रताप पवळ, स्वप्निल योगे, स्वराज साबळे, वल्लभ आगवान, अभिनव देव माने, राज बोरा, प्रणव तोंडे, दक्ष पिव्हळ, ओमराज राठोड, शुभांग वैद्य, वेदांत खेत्रे, गजानन होके व स्पर्श मेड.विजयाबद्दल सर्व स्तरातुन कौतुक केल जात आहे. या यशाबद्दल स्कूल चे चेअरमन गणेश मैड, स्कूल संचालिका शीतल मैड, स्कूल डायरेक्टर कोमाथ भास्करन, प्राचार्या जयश्री कदम, उप प्राचार्य दीपक झा उप प्राचार्य कृष्णाकुमार, परिवेशिका मेरी अलेंझांडर, स्वाती राठोड, क्रीडा शिक्षक अशोक चौरे, दिनेश ढाकणे आदीनी सर्व विजय संघातील खेळाडूंचे अभिनंदन करून कौतुक केले आणि पुढील होणाऱ्या स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.

