अतिवृष्टी ग्रस्त नांदेड परभणी भागातील शेतकऱ्यांना तातडीने अनुदान व नुकसान भरपाई द्या अन्यथा जिल्हाधिकाऱ्याला घेरावा घालू-
राज्याचे कृषिमंत्री गणेश उत्सव दंग- छत्रपती संभाजी राजे मा9खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री बच्चू कडू आणि नारायण अंकुश यांचा इशारा
परभणी नांदेड- मराठावाडातील परभणी नांदेड सह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोडाशी आलेले मूग उडीद हरभरा कापूस सोयाबीन आधी पीक पाण्याखाली वाहून गेले असून बळीराजाला यामुळे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे, तर काही ठिकाणी घरे सुद्धा वाहून गेली असून राज्य सरकारला याबाबतीत कसलेही गांभीर्य नसून राज्याचे कृषिमंत्री गणपती उत्सवात दंग आहेत.
शेतकऱ्यांना आणि बेघरांना सानुग्रही अनुदान आणि नुकसान भरपाई आठ दिवसाच्या आत देण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा छत्रपती संभाजी, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री बच्चुभाऊ कडू, आणि नारायण अंकुशे यांनी परभणी जिल्ह्यातील वझुर बुद्रुक या गावी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची पाहणी आणि संवाद करताना दिला..
याबाबत अधिक माहिती अशी की दुष्काळग्रस्त मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून या बळीराजाचे आता तोंडाशी आलेले पीक नष्ट झाले असून गाई म्हशी जनावरे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर दगावले असून अनेक शेतमजलाचे घरे वाहून गेले असून संसार उघड्या पडल्याची परिस्थिती नांदेड आणि परभणी भागात दिसून आली असून याचीच पाहणी करण्याकरिता आणि बळीराजाशी संवाद साधण्याकरीता सोमवार, दि. ९ सप्टेंबर स. ७.३० वाजल्यापासून
नांदेड व परभणी जिल्ह्यात- मा. छत्रपती संभाजीराजे (स्वराज्य पक्ष प्रमुख)- मा. बच्चूभाऊ कडू (प्रहार पक्ष प्रमुख)- मा. राजू शेट्टी साहेब (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
-मा. नारायण अंकुशे (अध्यक्ष, भारतीय जवान किसान पार्टी) हे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याचा संयुक्त दौरा केलाअसून दौऱ्याचा नांदेड येथील उंचाडा, ता. हदगाव
मारलेगाव धानोरा तर परभणी
द मौजे वझुर या गावी नुकसान पाहणी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर परत एकदा आत्महत्या करण्याची वेळ आली असून राज्याचे कृषिमंत्री गणेश दंग आहेत. राज्य सरकार शेतकऱ्या बद्दल कसलीही सहानुभूती नसून फक्त तुटपुंजी रक्कम देऊन मतदान विकत घेण्याचे काम सरकारकडून चालू आहे. शेतकऱ्यांना उपस्थित मान्यवरांनी हमी दिली की आठ दिवसाच्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई सरकारने नाही दिली तर जिल्हाधिकाऱ्याला घेरावा घालून तीव्र आंदोलन करू आणि जोपर्यंत भरपाई मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही
असे आश्वासन छत्रपती संभाजीराजे, आ. बच्चू कडू, खा. राजू शेट्टीं मा नारायण अंकुशे यांनी शेतकरी शेतमजूर माता भगिनी यांना दिले योवळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.